Day: January 14, 2026

  • सागर कारंडे Vs तन्वी कोल्ते : पहिल्याच टास्कमध्ये पेटलेला वाद, नेटकरी कोणाच्या बाजूने?

    कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या Bigg Boss Marathiच्या प्रोमोमध्ये घरात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे आणि अभिनेत्री तन्वी कोल्ते यांच्यात वादाची ठिणगी पडल्याने शोची सुरुवातच चर्चेत आली आहे.


    प्रोमोनुसार, पतंग कापून नॉमिनेशन बॉक्समध्ये टाकण्याचा हा टास्क होता. या पहिल्याच टास्कमध्ये तन्वीने सागरची पतंग कापली आणि थेट म्हणाली की, “सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत.” हा निर्णय ऐकताच सागर चांगलाच संतापलेला दिसतो. तो तन्वीला उद्देशून, “एवढी तरी अक्कल पाहिजे ना, नॉन्सेन्स… काय बोलतोय आपण,” असे म्हणतो.


    सागर चिडल्यानंतर तन्वीही प्रत्युत्तर देते, “मी नॉन्सेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाहीये.” त्यावर सागर आवाज चढवत म्हणतो, “मी तुला आधीच म्हटलेलं, मी बोलताना मध्ये बोलायचं नाही.” यानंतर तन्वीही आवाज वाढवून, “एsss आवाजाला मी घाबरत नाही, तू मला शिकवणार?” असे म्हणताना दिसते.


    दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तन्वीवर जोरदार टीका केली आहे.
    “तन्वीने वयाचे भान ठेवून वागायला हवे,”
    “हिला मोठ्यांशी बोलायची अक्कल नाही,”
    “मोठ्या माणसांशी नीट बोलायला शिक आधी,”
    “सागर कारंडेला फुल्ल सपोर्ट,”
    “पहिल्या दिवसांपासून ओव्हर अॅक्टिंग सुरू…”
    अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत.


    एकीकडे टास्कमधील स्ट्रॅटेजी, तर दुसरीकडे वादातील भाषा आणि सूर—या सगळ्यावरून प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. आता पुढील एपिसोड्समध्ये हा वाद कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
    तुमचा सपोर्ट कोणाला? सागर कारंडे की तन्वी कोल्ते?

    अशाच मनोरंजनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.