बिग बॉस मराठी ६ : अनुश्री माने विरुद्ध दिव्या शिंदे – वादाने पेटलं घर, प्रेक्षक काय म्हणतात?

Bigg Boss Marathi 6 सध्या चांगलाच रंगात आला असून, प्रत्येक टास्कसोबत घरातील वातावरण अधिक तापताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी स्पर्धकांना ‘बीबी फार्म’ हा खास टास्क दिला होता. या टास्कदरम्यान अनुश्री माने आणि दिव्या शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

प्रोमोमध्ये दिसते की अनुश्री दिव्याला, “तू नको सांगू” असे म्हणते. त्यावर दिव्या, “मी माझं मत मांडतेय” असे म्हणत इंग्रजीत, “You are not supposed to tell me” असे उत्तर देते. यावर अनुश्री चांगलीच संतापलेली दिसते.

अनुश्री दिव्याला सुनावत म्हणते,

“मराठी शोमध्ये आहेस, मराठी बोलायला शिक. इंग्लिश बिग बॉसमध्ये जा.”

यावर दिव्याही शांत बसत नाही. ती स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर देत म्हणते,

“वाढीवपणा तुझ्याजवळ ठेव. विषय संपला.”

या वादामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही प्रेक्षक अनुश्रीच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण दिव्याच्या मत मांडण्याच्या हक्काचं समर्थन करत आहेत.

दरम्यान, हा वाद पुढे काय वळण घेणार? घरातील समीकरणांवर याचा काय परिणाम होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तुम्हाला काय वाटतं? अनुश्रीचं म्हणणं योग्य आहे का, की दिव्याची भूमिका बरोबर आहे? तुमचं मत नक्की कळवा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *