Bigg Boss Marathi 6 मध्ये दिवसेंदिवस नाट्य अधिकच वाढत चाललं आहे. नुकताच घरात अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात झालेला जोरदार वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वादाच्या दरम्यान अनुश्री माने भावनिक होत म्हणाली,
“मला तू हाताला धरून माझ्या बेडवरून उठवलास ना, तिथे माझ्या डोक्यात गेलास तू.”
अनुश्रीच्या या वक्तव्यावर राकेश बापट संतापला आणि त्याने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला,
“हे बोलणं चुकीचं आहे. Do not bloody say that again. आयुष्यात मी पंचवीस वर्ष एवढं काम केलंय. कोणाची हिंमत आहे की मला असं बोललं जाईल?”
इतक्यावरच न थांबता राकेशने पुढे असंही सांगितलं की,
“मला या घरात थांबायचं नाही आहे.”
या वादानंतर घरातील वातावरण पूर्णपणे तापले असून इतर सदस्यही हादरल्याचं पाहायला मिळालं. प्रेक्षकांमध्ये या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहीजण अनुश्रीची बाजू घेत आहेत, तर काहीजण राकेशला पाठिंबा देत आहेत.
हा वाद Bigg Boss Marathi 6 च्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त क्षणांपैकी एक ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढील भागात बिग बॉस काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.






