बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या वादामुळे स्पर्धक तन्वी कोलते सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. टास्कदरम्यान सागर कारंडे यांच्याशी झालेल्या भांडणात तन्वीच्या वक्तव्यावरून प्रेक्षकांसह अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणावर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विनोदी कलाकारांना हलक्यात घेण्याच्या वृत्तीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, तन्वीच्या खेळण्याच्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशाखा सुभेदार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे—
“सागर कारंडे मस्त खेळतोयस रे.. कॉमेडी करतो? जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकारला… कोणीही कालच्या पोरींनी यावं टपली मारून जावं! ह्यांनी काय अनुभवलंय? असं किती काम केलं?? असो… शब्द पलटवले तिने नंतर! पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण दहाव्या आठवड्यात खेळतेय असं का खेळतेय? लगेचच दुसऱ्यांना ‘तू मला सपोर्ट करणार का’ वगैरे??? अगं असं काय केलंस इतरांसाठी की तू त्यांच्याशी डील करतेयस?? आधी ‘दिल’ तर जिंक त्यांचं..! ते मला वाटतं तिला शक्य नाही… किरकिर, कर्कश आवाज..! शी…”
विशाखा सुभेदार यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला वेग आला असून, अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी हा वाद अनावश्यक असल्याची मतंही मांडली आहेत. आगामी भागांमध्ये हा वाद आणखी वाढतो का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
अशाच मनोरंजनविश्वातील ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी आमचं पेज नक्की फॉलो करा.
Leave a Reply